परळी तालुक्यातील नंदागौळ येथील शेतकरी सोपान गीते यांनी अर्धा एकरात भुईमुगाची यशस्वी लागवड केली. कमी खर्चात (८-१० हजार) त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. तीन महिन्यांत पीक तयार होत असल्याने व चांगला भाव मिळत असल्याने हे पीक फायदेशीर ठरत आहे. शेतीत केवळ एकच पीक न घेता विविध पिकांची लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले.