बीडच्या परळीत पंधरा दिवस घेतलेल्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. परळी सह परिसरात पाऊस बरसल्याचे पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसापासून पावसाने परिसरात उसंत घेतली होती. रात्री तासभर झालेल्या पावसामुळे परिसरात रस्त्यावर पाणी साचल्याचं दिसून आलं.. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिलाय.