बीड जिल्ह्यातील नाळवंडी ते बीड रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात त्यांनी अर्धनग्न मोर्चा काढला. 'रस्ता नाही तर मतदान नाही' असा पवित्रा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला आहे.