पहिल्याच पावसात माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर जिल्हा परिषद शाळेच्या परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. या शाळेत पाच वर्गांसाठी केवळ दोनच खोल्या उपलब्ध असल्याने एकाच खोलीत दोन ते तीन वर्ग भरवावे लागत आहेत. शाळेच्या इमारतीची दुरवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव आणि साचणाऱ्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.