पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत असताना आष्टी तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला असून गावा-गावात पाणी नसल्याने काही गावात पाण्याचे टॅकर सुरु करण्यात आले आहेत.ज्या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे ते पाणी पिण्यासाठी स्वच्छ नसल्याने ग्रामस्थांनी स्वच्छ पाणी पुरवण्याची मागणी केली आहे.