काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने बीडच्या कऱ्हेवडगाव येथे कित्येक शेतकऱ्यांच्या घरांचे आणि शेतीच्या फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावचे सरपंच परिवंत गायकवाड यांनी तात्काळ शेतकरी कुटूंबाची भेट घेऊन सर्व आढावा घेऊन सर्व माहिती आमदार सुरेश धस यांना कळवली आहे. कऱ्हेवडगाव येथील सैनिक दत्तात्रय खांडवे हे पठाणकोट येथे सीमेवर देशसेवेसाठी तैनात असताना त्यांच्या कऱ्हेवडगाव गावातील पत्र्याचे घर उडून जाऊन सर्व संसार उघड्यावर पडला आहे, त्यामुळे सैनिकाच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला आहे.