बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हाजीपूर येथे पैशांसाठी मुलाने वडिलांना अमानुष मारहाण केली. संतोष साप्ते नावाच्या मुलाने वृद्ध बापाला लाकडी दांड्याने व दगडाने बेदम मारले. या गंभीर प्रकरणी आष्टी पोलिसांत आरोपी संतोष साप्तेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या मागणीतून झालेल्या या हिंसक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.