बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून भाव वाढीच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रत्येक गावागावात टायर पेटवून कारखानदारांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यानंतर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली ती बैठक निष्फळ ठरली. यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यांच्या गाडीची हवा सोडून दिली तर अनेक ट्रॅक्टरची आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा सोडत छत्रपती सहकारी साखर कारखाना बंद पाडला आहे