बीडमध्ये ऊस उत्पादकांना कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कारखान्याच्या गाडीची हवा सोडल्याच्या आरोपावरून ही दमदाटी झाल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात एक कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली असून, टीव्ही नाईन मराठी या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही, मात्र या घटनेने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.