शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया होणार होती त्या अगोदरच राजकीय नाट्य पाहायला मिळून आला आहे. या निवडीसाठी भाजपच्या वतीने माधवी मकरंद पाटील यांनी उपनगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी अधिकृत अर्ज मुख्याधिकारी पिंजारी यांच्याकडे सादर केला आहे. मात्र उपनगराध्यक्षांच्या दालनाला नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी टाळ ठोकलं असल्याने भाजप आणि जनता विकास आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे.