शेतीत वर्षभर राबणाऱ्या 'सर्जा-राजा' प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा बेंदूर सण आज बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर बळीराजाने आपल्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. सायंकाळी डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात आपल्या सर्जा-राजाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सध्या शेती-कामासाठी बैलांचा वापर कमी झाला असला तरी, शेतकऱ्यांचा उत्साह मात्र कायम होता. विशेष म्हणजे, खंडोबाच्या वाडीत बैल आणि गाईचा पारंपरिक विवाह लावण्याची प्रथा या निमित्ताने आजही जपली जात असून, तिथे बैलांची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती.