मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार, या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयात धडक दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लाभ कशामुळे बंद झाला, याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.