सध्या बाजारात खोट्या पेमेंट फसवणूक ॲपचे पेव फुटले आहेत. दुकानदारांना भामटे चुना लावत आहेत. क्युआर कोडद्वारे हे भामटे पेमेंट करतात. पेमेंट झाल्याचे दिसतेही. त्यावर दुकानदार विश्वास ठेवतो. त्यानंतर दुकानदाराच्या खात्यात ही रक्कम काही जमा होत नाही. दुकानदाराचे मोठे नुकसान होते.