भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील प्रसिद्ध चित्रकार भैरवी निर्वाण या प्रत्येक सणानिमित्त वेगळ्या संकल्पनेतून कलाकृती साकारून नागरिकांचे लक्ष वेधतात. यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी आईस्क्रीमच्या काड्यांचा वापर करून प्रभू येशूंची आकर्षक प्रतिमा साकारली आहे.