भंडारा नगर परिषद निवडणुकीत भाजपने माजी मंत्री परिणय फुके यांच्या नेतृत्वात दणदणीत विजय मिळवला. स्थानिक शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांना पराभूत करत भाजपने दोन नगराध्यक्ष निवडून आणले. या विजयाचा जल्लोष करताना आमदार फुके यांनी 'दंड थोपाटला', ज्यामुळे स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.