भंडाऱ्याच्या चप्राड पहाडी परिसरात दोन अस्वलांनी 'नाईट सफारी' केल्याने दहशत पसरली आहे. मध्यरात्री मंदिर परिसरात अस्वलांचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला. यापूर्वीही अस्वलांचे दर्शन झाल्याने भाविक आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.