केंद्रिय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर येताच भंडाऱ्यामध्ये तरुणांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. शहरातील गांधी चौकात एकत्र येत युवकांनी एकमेकांना पेढे भरवले आणि फटाक्यांची आतिशबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनानंतर मोदी सरकार युवकांसमोर नमल्याची भावना व्यक्त होत आहे.