भंडाऱ्याच्या जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून उष्माघाताचा धोका गंभीर स्वरूप धारण करत आहे. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने 44 विशेष कक्ष उभारून 168 खाटांची सुविधा उपलब्ध करून नागरिकांच्या आरोग्यसुरक्षेला प्राधान्य दिले आहे.