भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसाळा येथील शेतकरी प्रवीण सेलोकर यांनी पारंपरिक शेतीसोबत बागायती शेतीकडे यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. त्यातील अडीच एकरमध्ये धानाची तर उर्वरित एक एकरमध्ये मिरचीची लागवड ते करतात.