भंडारा जिल्ह्यात युवा रुरल असोसिएशनच्या माध्यमातून १७ हजारांहून अधिक घरांमध्ये मोफत गोबर गॅस प्लांट बसविण्यात आले आहेत. गेल्या तीन-चार वर्षांपासून अनेक कुटुंबे याचा यशस्वी वापर करत आहेत. मोहाडी तालुक्यातील पारडी येथील झंजाळ कुटुंबीयही गेल्या तीन वर्षांपासून या गॅसचा लाभ घेत आहेत. त्यामुळे सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे एलपीजी सिलेंडरचा तुटवडा जाणवत असतानाही या कुटुंबांसह गोबर गॅस बसवण्यात आलेल्या 17000 हून अधिक परिवारांना मात्र कोणतीही अडचण भासत नाहीये.