धान्याचा कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी भीषण संकटात सापडला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर शेतकऱ्यांनी कशीबशी धानाची रोपे तयार केली होती. मात्र, आता कडक उन्हामुळे कोवळी रोपे जळून खाक होत आहेत, तर लावलेल्या धानाच्या शेताला मोठ्या भेगा पडल्या आहेत.