भंडारा नगरपरिषदेने बस स्थानक ते त्रिमूर्ती चौक मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. पूर्वसूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने जेसीबीच्या साहाय्याने ही मोहीम राबवण्यात आली. यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्ता मोकळा झाला आहे.