भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून शासनाकडून वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात तोडगा न निघाल्याने बाधितांचा संयम सुटत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी कवडसी फाट्याजवळील पाण्याच्या टाकीवर चढून अनोखे आंदोलन केले. यानंतरही प्रशासनाने दखल न घेतल्याने पिपरी पुनर्वसन ते कवडसी फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.