भंडारा जिल्ह्यात आज हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जिल्हा तीव्र उन्हाने आणि उकाड्याने होरपळून निघाला होता. आज सकाळीही नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. मात्र, दुपारी अचानक आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात झपाट्याने गारवा निर्माण झाला असून, सकाळपासून उष्णतेने हैराण झालेल्या भंडारावासीयांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे.