भंडारा जिल्ह्यातील करडी पोलिसांनी बनावट नंबरप्लेट व ई-टीपीचा गैरवापर करून चालणाऱ्या रेती चोरी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. देव्हाडा खुर्द येथे धाड टाकून तीन टिप्पर पकडले. कागदपत्रांची तपासणी केली असता, नंबरप्लेट आणि चेसीस नंबरमध्ये मोठा फरक आढळला. या प्रकरणी टिप्पर चालकांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.