भंडाऱ्याच्या कुंभली येथील दुर्गाबाई डोह यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधन शिबिर आयोजित केले होते. नेफडो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने भूतबाधा, जादूटोणा व बुवाबाजीसारख्या भ्रामक कल्पनांना वैज्ञानिक प्रयोगांनी आव्हान दिले. जळता कापूर खाणे, नारळातून वस्तू काढणे यांसारख्या चमत्कारांमागील सत्य उलगडून दाखवत, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला. यामुळे नागरिकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा संदेश मिळाला.