भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात एम पब्लिक स्कूल मानेगाव येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व उल्हास मेळावा आयोजित करण्यात आला. ७५ शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. नवभारत साक्षरता अंतर्गत हा उपक्रम यशस्वी झाला, जिथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांनी भेट दिली. या बाल वैज्ञानिक मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.