दरवर्षी हिवाळ्यात भाजीपाल्याचे दर घसरतात. मात्र यंदा भंडारा जिल्ह्यात यंदा वेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. थंडी वाढली असतानाही भाजीबाजारातील दर मात्र चढलेलेच पहायला मिळत आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो व वांगी ४० ते ५० रुपये प्रति किलो विक्री होत असून पत्ताकोबी व फुलकोबीचे दर ६० ते ८० रुपये आहेत. चवळीच्या शेंगांना तर ८० रुपये किलो दर मोजावा लागत आहे.