भंडारा जिल्ह्यातील मोहाडी शहराच्या मध्यवर्ती भागातील भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप परवापासून पेट्रोलअभावी बंद ठेवण्यात आला आहे. पंपावर याबाबतचा फलकही लावण्यात आला असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनधारकांना दूरवरच्या पंपांवर धाव घ्यावी लागत असल्याने वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे.