चक्क एटीएम मशिन मध्ये नाग साप पाहून धक्काच बसला. भंडारा जिल्ह्याच्या पिंपळगाव झंझाड येथील एटीएम मशिन मध्ये चक्क नाग साप आढळून आला. बँकेत साप दिसताच कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. लगेच सर्पमित यांना पाचारण करण्यात आले. सर्प मित्र यांनी घटनास्थळी पोहचत ज्या ठिकाणी रोकड ठेवली जाते तो बॉक्स बाहेर काढला व सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. मात्र एटीएम मशिनमध्ये विषारी साप असल्याचं काळातच काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती.