पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासह आमदार,खासदार दाखवा आणि बक्षिस मिळवा अशी दवंडी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील कवलेवाडा ग्रामपंचायतीने दिली आहे. जो कोणी त्यांना शोधून देईल त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल असेही ग्रामपंचायतीने म्हटले आहे. ग्रामपंचायतच्या हद्दीतील स्मशानभूमी आणि इतर विकास कामांची अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र प्रशासन आणि राजकीय पुढारी याकडे लक्ष देत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपोषण करीत पालकमंत्री आमदार खासदार हे बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावले आहे.मागणी पूर्ण न झाल्यास राज्यमार्ग बंद करण्याचा इशाराही ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला