भंडारा जिल्ह्यातील सिल्ली इथं दोन दिवसीय शंकरपट मोठ्या उत्साहात पार पडला. परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांसह मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. बैलांच्या ताकदीचं आणि वेगाचं रोमांचक प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या पारंपरिक ग्रामीण क्रीडा संस्कृतीमुळे गावात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं. आयोजकांनी ही परंपरा जपण्याचा संकल्प केला.