भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथे गावातील महिलांच्या धुणी धुण्याच्या ठिकाणी अचानक नाग निघाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर सर्पमित्र समित हेमने यांनी त्या ठिकाणी पोहचत भल्यामोठ्या नागाला सुरक्षित पकडत नैसर्गिक अधिवासात सोडले. यामुळे महिलांची भीती दूर झाली असून नागालाही नैसर्गिक अधिवास मिळाला आहे.