भंडारा जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान तब्बल ३०८४ लोकांना श्वानांनी चावा घेतला. रस्त्यांवर श्वानांच्या झुंडी दिसत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला असुरक्षित आहेत. जिल्हा व नगरपालिका प्रशासनाने तात्काळ नसबंदी आणि नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.