भंडाऱ्याच्या साकोली येथे पाटबंधारे विभागाच्या तलावाचे बांध फुटून लाखो लिटर पाणी गेले वाहून गेले असून परिसरातील 250 ते 300 हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या आठ दिवसात धान रोवणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.