भंडारा जिल्ह्यात काल रात्री पावसानं सर्वदूर जोरदार हजेरी लावली. याचा फटका तुमसर शहरवासियांना चांगलचं बसला. जोरदार पावसाच्या हजेरीनंतर तुमसर शहरातील अनेक भागातील साखल भागात पावसाचं पाणी साचलं. नगर पालिका प्रशासनानं पावसाळापूर्व नाले सफाई केली नसल्यानं सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण झाल्यानं हे पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं.