अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान असलेले भंडारदरा धरण अखेर आज भरले आहे..धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस कोसळत असून धरणाचा पाणीसाठा 98 टक्क्याच्या पार झाला असून धरणातून 12 हजार क्यूसेक वेगाने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले आहे.दरवर्षी 15 ऑगस्टला भंडारदरा धरण भरण्याची परंपरा यंदा मात्र खंडित झाली आहे.