महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण जलस्रोत आणि ब्रिटीशकालीन बांधकाम असलेल्या भंडारदरा धरणाने आपल्या स्थापनेपासूनच्या 99 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आता 100 व्या वर्षात म्हणजेच शताब्दी वर्षाकडे यशस्वी पदार्पण केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी धरणाची पूजा करून भंडारदरा धरणाचा वाढदिवस साजरा केला.