जोरदार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाची धरणं भरण्यास सुरुवात झाली. पाणलोट क्षेत्रातील भंडारदरा, घाटघर आणि रतनवाडी यांसारख्या भागांत विक्रमी पाऊस सुरू असल्याने धरणाताल पाणीपातळी झपाट्याने वाढत असून भंडारदरा धरण आणि निळवंडे धरण प्रत्येकी 90 टक्के भरले आहे. तर, मुळा धरणही 85 टक्के भरले आहे.