मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला. सीपीएमचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको सुरूये. पालघरच्या चारोटी येथे महामार्ग रोखला असून दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झालीये. रास्ता रोको आंदोलनात सीपीएमच्या कार्यकर्त्यांसह आशा वर्कर आणि परवानाधारक प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक देखील उपस्थित आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या विविध मागण्यासाठी व कामगार विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे.