रायगड जिल्ह्याला अखेर पालकमंत्री मिळाला आहे. भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर पनवेलमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला. शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.