राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी तिवसा तहसील कार्यालय परिसरात बेमुदत अन्नत्याग व साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली. गुरुदेव भक्तांच्या नेतृत्वाखाली क्रांतीज्योत व मशाल पेटवून आंदोलनाचा शुभारंभ करण्यात आला.