महेंद्र दळवींच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भास्कर जाधव यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री व आमदार उघडपणे पैशांचे प्रदर्शन करत असून, हे पैशांचे वाटप निवडणुकीसाठी केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. जाधव यांच्या मते, हा सर्व पैसा काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचा आहे.