मुंबई-गोवा महामार्गावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी स्वत: बुलेट चालवत फेरफटका मारला. ठाकरे गटातील एका कार्यकर्त्याने नुकतीच बुलेट घेतली होती. ती दाखवण्यासाठी तो थेट जाधव यांच्या कार्यालयात पोहोचला, तेव्हा त्याच बुलेटवरून भास्कर जाधव यांनी फेरफटका मारला.