उरणच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक भावनाताई घाणेकर यांनी जिंकली आहे. “उरणच्या नगराध्यक्षपदाचं स्वप्न मी कधीच पाहिलं नव्हतं. पण उरणच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो शब्दात मांडता येणार नाही. हा सन्मान माझा नसून सर्व कार्यकर्त्यांचा आणि उरणच्या जनतेचा आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि प्रामाणिकपणे काम करेन.” अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.