पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरात बुलढाणा येथील भगत कुटुंबाला सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीचा सामना करावा लागला. VIP दर्शनासाठी पैशांची मागणी करत असल्याचा आरोप केल्याने, सुरक्षा रक्षकांनी भाविकांना लोटपाट करून दर्शनापासून वंचित ठेवले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, मंदिरात सुरक्षारक्षकांची अरेरावी उघड झाली आहे. मंदिर व्यवस्थापनाने यावर कठोर कारवाई करण्याची भाविकांची मागणी आहे.