भिवंडीत शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक, तीनबत्ती, भाजी मार्केट परिसरासह विविध भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर ड्रेनेज लाईनमध्ये कचरा अडकल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. अशा परिस्थितीत स्पायडरमॅनचा पोशाख परिधान केलेला एक तरुण नागरिकांच्या मदतीसाठी धावून आला. त्याने थेट पाण्यात उतरून रस्त्यावरील कचरा हाताने साफ केला आणि पाण्याचा मार्ग मोकळा केला.याशिवाय, पाण्यातून मार्ग काढणाऱ्या नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी व वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढण्यासाठी मदत केली आहे.त्याच वेळी छोट्या मुलांना खांद्यावर बसवून त्यांचे मनोरंजन केले आहे.