नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. भोकर नगरपालिकेच्या मतदानानंतर EVM मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्रॉंग रूमला CCTV कॅमेरे, SRPF जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट पहारा आहे. मतमोजणीपर्यंत EVM च्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जात आहे.