जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात काल दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट झाली. तर आडगाव भोंबे, वडोद तांगडा, जळकी बाजार, हिसोडा, दहिगाव, आणि परिसरातील इतर गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय.