राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात ईडीने दोषमुक्त केले. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यातही क्लीन चिट मिळाली होती. या निर्णयामुळे येवल्यातील त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'सत्य परेशान हो सकता है पराजित नाही' असे बॅनर लावून भुजबळांना पाठिंबा दर्शविला जात आहे. या दिलाशाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.